Monday, March 26, 2012

साले डाकू तो सांसद में बैठे है,,,

||श्री नथुरामाय नमः ।।
गेल्या काही दिवसात सातारा सांगली येथे अफुच्या शेतीचा शोध
महाराष्ट्र सरकार आणि पोलिसाला लागला,,
अनेक ठिकाणी त्यानिमित्ताने छापे घालून त्या त्या शेतकऱ्यां विरुध्द कारवाई देखील केली,
खरतर हे सर् सापडल्यावर निदर्शनास आल्यावर आणि शेतकर्यांवर कायदेशीर बडगा उगारण्या आधी आधी हि अफू लागवडीची पाळी शेतकर्यांवर का आली
ह्याचा विचार केला असता तर सरकारलाच
तुरंगात डांबाव लागला असत,,,

ईथे मला परवाच पाहिलेला "पानसिंग तोमर "सिनेमातला एक
डायलॉग आठवतो एक पत्रकार पानसिंग तोमारची मुलाखत घेताना विचारतो,
"तुम्ही डाकू कसे बनलात"?
त्यावर पानासिंग जे उत्तर देतो ना त्यावर आख्खा सिनेमा ओवाळून टाकावासा वाटतो,पानसिंग म्हणतो,
"डाकू? हम डाकू नाही हम तो बागी है
साले डाकू तो सांसद में बैठे है,,,"

गुन्हेगाराने गुन्हा केल्यास त्याची सखोल चौकशी होते त्यामागची कारण शोधली जातात .
मग हि बेकायदेशीर अफूची लागवड धाडस शेतकऱ्याने का केले,,?
कारण,,,साले डाकू तो सांसद में बैठे है,,,
परंपरागत शेती करण आजच्या घडीला कठीण होवून बसल आहे,,
कारण,,साले डाकू तो सांसद में बैठे है,,,
शेतकरी शेतात निरनिराळे आधुनिक प्रयोग करत आहे,
परंतु तरीही अपेक्षित बाजार भाव त्याला आज हि मिळत नाही ,
कारण,,साले डाकू तो सांसद में बैठे है,,,
मजुरांचे दर न परवडणारे आणि ते मिळवण कठीण झाल आहे.
त्यांची जमा खर्चातच वजा होत आहे
कारण,,साले डाकू तो सांसद में बैठे है,,,
अतोनात खर्च करून शेतीला नीट पाणी नाही.
शेतीला वीज नाही तिथेही भारनियमन ,,
कारण,,साले डाकू तो सांसद में बैठे है,,,
१६\१७ तासांचे भारनियमन काय चेष्टा आहे राव?
परिणामी आर्थिक उत्त्पन्न कुठून मिळणार ?
खर्चाची तोंडमिळवणी शक्य आहे?
उत्पन्नच कमी हे कोण लक्षात घेणार?
मग अशावेळी रिकाम्या पोटीचा माणूस चोरी नाही करणार तर काय करणार?नेमकी ह्याच मुळे अफूची लागवड झाली नसेल कशावरून?
आणि नेमकी याची चौकशी केली असती तर,,?

काही उपाय योजना राबवली असती तर,,?
तर हि वेळ आली असती,,?
शेतकऱ्याने अफू लावली असती,,?

जास्त काही नाही शेतीवर आधारित उद्योग ,आणि पर्यटन व्यवसाय हा जरीशास्त्रशुध्द पद्धतीने राबवल तरी पुढील पाच वर्षात
सारा महाराष्ट्र श्रीमंत आणि समाधानी होईल,
मग अफूची गरज कशाला लागेल?
पण आपले शेती मंत्री कीरकेट,कीरकेट आणि फकस्त कीरकेट
ह्याशिवाय त्यांना आयपियल,बाप पियल,मुलगी पियल,जावई पियल ईतकच काय ते माहित ,

बर आज ज्यांना आज अफू लागवड माहित नाही त्यांना ती माहीत झाली आहे त्यांनी हे उद्योग करू नयेत यासाठी तरी करणार आहेत?
का ही हि अफू नव्हे हि तर खसखस आहे म्हणून दुर्लक्ष करणार आहेत? असे
रोगालाच उपचार ठरवू पाहणारे डॉक्टर असतील तर पानसिंग म्हणतो ते बरोबरच म्हणायचे
साले डाकू तो सांसद में बैठे है,,,

No comments:

Post a Comment